Breaking News

मुरूडचे प्रभारी बीडीओ सुभाष वाणी यांनी पदभार स्वीकारला

मुरूड : प्रतिनिधी

येथील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुभाष वाणी यांनी गुरुवारी (दि. 11) मुरूडच्या गट विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. या वेळी पंचायत समितीच्या सर्व कर्मचार्‍यांनी सुभाष वाणी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

मुरूडचे गटविकास अधिकारी अनिकेत पाटील हे एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्याने त्या पदाचा कार्यभार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी वाणी यांच्याकडे देण्यात आला आहे.

वाणी यांनी गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला त्या वेळी पंचायत समितीचे कक्ष अधिकारी वानखेडे, सचिन मुनेश्वर, विस्तार अधिकारी संजय शेडगे, लेखधिकारी पी. पी. सावंत, ग्रामसेवक जे. आर. म्हात्रे, सुशांत ठाकूर, सी. ए. मगर, व्ही. आर. माळी, एस. पी. नागोठकर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‌‘जीवन गौरव‌’ प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तजनसेवेच्या महान यज्ञामध्ये उल्लेखनीय योगदान देत भावी पिढीला प्रेरणा देणारे माजी खासदार, …

Leave a Reply