Breaking News

पर्यटन क्षेत्रात पोलिसांकडून सुरक्षा

पनवेलच्या गाढेश्वर, नेरे परिसरात सुचना फलके

पनवेल : वार्ताहर

पनवेल परिसरात असलेल्या अनेक ठिकाणी नदी, डोह व धबधब्यावर पनवेलसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे आदी  ठिकाणावरून पर्यटक दरवर्षी पावसाळ्याच्या वेळी वर्षा सहलीसाठी येत असतात अश्या वेळी त्यांना पावसाचा व वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहून जाऊन अनेकांचा नाहक जीव जातो. तर कित्येक जण जखमी होतात, हे टाळण्यासाठी पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी मार्गदर्शनपर सुचना फलके अश्या ठिकाणी उभारले आहेत.

यामध्ये प्रामुख्याने नदी पात्रात जाणे अत्यंत धोकादायक आहे. नदी पात्रामध्ये बर्‍याच ठिकाणी मोठे व खोल डोह असल्याने ते समजुन येत नाहीत. आपण आलेले परिसरात पाऊस नसला तरी, माथेरान येथे पाऊस झाल्यास पाण्याचे प्रवाहामध्ये अचानक पणे मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने व ते लगेच समजुन येत नसल्याने काही लोकांचा यापुर्वी सदर नदीपात्रात बुडून मृत्यू होवुन बर्‍याच दुर्घटना झालेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी त्याबाबत दक्षता घ्यावी. लहान मुले, स्त्रीया व ज्या लोकांना पोहता येत नाही. त्या लोकांनी पाण्यात उतरू नये. गाढेश्वर धरणातून पनवेल शहरास पिण्याचे पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे  नदीपात्रात उतरून अगर कोणतेही पदार्थ अथवा वस्तु टाकून पाणी दुषित करू नये.

परिसरात अंमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक द्रव्य आणण्यास व पिण्यास मनाई आहे. सदर परिसरात अंमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक द्रव्य बाळगताना अगर पिताना कोणी आढळल्यास कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. हा परिसर डोंगराळ असुन रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने, अ‍ॅम्ब्युलन्स यांना जाण्या येण्यासाठी रस्ता खुला रहावा. यासाठी रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा तर्‍हेने रस्त्याचे कडेला वाहने उभी करू नयेत. रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा तर्‍हेने उभे करण्यात आलेले वाहनचालकावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल  सदर परिसरात वर्षा सहलीसाठी येणार्‍या पर्यटकांनी वाहनांचा वेग मर्यादीत ठेवावा. तसेच नशा करून वाहन चालवु नये तसे आढळुन आल्यास तात्काळ कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

परिसरातील वरीलप्रमाणे धोक्याचे अनुषंगाने जनतेच्या जिवीताची व सुरक्षेची जबाबदारी लक्षात घेवुन, सदर परिसरात पावसाळी पर्यटकांना गाढेश्वर धरण, वारदोली धबधबा मोर्बे धरण, कुंडी धबधबा (अर्पिता फार्म हाऊस जवळील धबधबा), हरिग्राम नदीपात्र, धोदाणी नदीपात्र, चिंध्रण व मोहोदर नदीपात्र, शांतीवन नदीपात्र, माची प्रबळ, कर्नाळा अभयारण्य भेटी देण्यास जा.क्रं. / सपोआ/नमुं / मनाई / 4439/2022 दि. 22/06/2022अन्वये फौजदारी प्रक्रिया संहीताचे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे.

नागरिकांना आवाहन

स्थानिक रहीवासी व सुज्ञ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वरीलप्रमाणे कृती करताना कोणी आढळुन आल्यास तात्काळ पनवेल तालुका पोलीस ठाणे संपर्क 022-27452444 / 7045918041 तसेच नेरे बीट अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक फडतरे यांचा संपर्क क्रमांक 9960547184 यावर संपर्क साधुन माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply