Breaking News

स्व. चांगू काना ठाकूर यांचा पुण्यस्मरण सोहळा

माउलींवर पुष्पवृष्टीने कार्यक्रमाची सांगता

पनवेल : रामप्रहर वृत्त

स्वानंद सुख निवासी चांगू काना ठाकूर यांचा 19वा पुण्यस्मरण सोहळा शिवाजीनगर येथे झाला. यानिमित्त श्री स. स. बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञानमंदिरात दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (दि. 2) सकाळी श्री समर्थ स. स. बाळकृष्ण महाराज माउलींवर पुष्पवृष्टी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी स्व. चांगू काना ठाकूर यांचे सुपूत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर  यांची उपस्थिती लाभली.

या वेळी उद्योगपती कानाशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर, अरुण ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, स्वप्निल ठाकूर, दर्शन ठाकूर, अमोघ ठाकूर, प्रतीक ठाकूर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, वसंतशेठ पाटील, उपसरपंच विजय घरत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, बाळासाहेब महाराज आदी उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply