शांघाय : वृत्तसंस्था
प्रशिक्षकाविना खेळणार्या भारतीय पुरुष संघाने येथे सुरू झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या कंपाऊंड प्रकारात पात्रता फेरीत चौथे स्थान मिळविले. प्रवीण कुमार याने वैयक्तिक गटात नववे स्थान मिळविले.प्रवीणने 704 गुणांची कमाई केली. यानंतर लवज्योत आणि गुरविंदर यांच्या सोबतीने प्रवीणने भारतीय संघासाठी 2091 गुणांची कमाई करीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. भारताची पुढील फेरीत गाठ 13व्या रँकिंगवर असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध पडेल.
महिला कंपाऊंड प्रकारात परविना 20व्या स्थानी आली. मोनाली जाधव आणि प्रिया गुर्जर यांना अनुक्रमे 24 आणि 25 वे स्थान मिळाले. या तिघींचा भारतीय संघ पात्रता फेरीत सहाव्या स्थानी राहिला. मुख्य फेरीत भारतीय महिला संघाला 11 व्या स्थानावरील सिंगापूरविरुद्ध सामना खेळायचा आहे. भारतीय संघासोबत कंपाऊंड प्रकारात कुठलाही कोच गेलेला नाही.