रसायनी : प्रतिनिधी
रसायनी व आसपासच्या परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असणार्या वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेचे पालन करण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर प्रशासकीय अधिकार्यांना त्यांच्या प्रभागात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयुक्तांकडून देण्यात आले होते, परंतु वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत तीन विकासकामांच्या पाट्या झाकल्या नसल्याने त्याची दखल घेत संबंधित अधिकार्यांनी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर यांना रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांनी निलंबित केले.