Breaking News

दहा दिवसांच्या बाळाला ‘संजीवनी’ हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया यशस्वी

पनवेल : वार्ताहर

दहा दिवसाच्या अर्भकाच्या हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या महेनतीमुळे व पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाली आहे.

तटकरे दांपत्याला मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली, मात्र त्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांना 10 दिवसानंतर निदर्शनास आले. त्यामुळे हृदयाची शस्त्रक्रिया करणे तातडीन गरजेची होती, मात्र त्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणे अवघड होत होते. याचवेळी त्यांचे खारघर सेक्टर 10 मोनार्क सोसायटी मध्ये राहणारे मित्र अमेय भांगळे यांच्या आईने नरेश ठाकूर यांना फोन करून या संदर्भातील माहिती दिली व त्यांना तातडीने मदत हवी आहे असे सांगितले व त्या बाळाला खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल येथे अ‍ॅडमिट करून तातडीने शस्त्रक्रिया केली तर तिचा प्राण वाचेल अशी माहिती दिली.

हे समजताच नरेश ठाकूर यांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला व याबाबतची सर्व माहिती देऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. त्यानुसार सदर बाळाला केईएम हॉस्पिटल येथून तातडीने श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल खारघर येथे हलवण्यात आले व उपस्थित डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून शस्त्रक्रिया यशस्वी केली.

ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली असून बाळाला 20 दिवसानंतर हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे या बाळाच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला असून, श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलसह माजी स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर यांच्या आभार मानले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply