Breaking News

कामगार क्षेत्रात आत्मप्रेरणेने काम करा -सुधीर घरत

उरण : प्रतिनिधी

भारतीय मजदूर संघ संलग्न असणार्‍या 32 महासंघांचे अखिल भारतीय पाच दिवसीय अभ्यासवर्ग शिबीर 13 ते 17 जुलै या कालावधीत नागपूर येथे होत आहे. या शिबिरात भारतीय मजदूर संघाला संलग्न असणार्‍या 32 महासंघाचे सुकाणू समितीचे 124 पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

या वेळी भारतीय पोर्ट अँड  डॉक मजदूर महासंघाच्या वतीने राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, कामगार क्षेत्रात काम करताना हे एक इश्वरीय काम आहे ही भावना मनात ठेऊन काम केले पाहिजे. कुणाला खुश करण्यासाठी नव्हे तर आत्मप्रेरणेने काम केले पाहिजे. संघटनेत विचार अनेक असू शकतात, परंतु अंतिम ध्येय एकच असले पाहिजे. त्यासाठी सर्वांचे विचार ऐकून एकच विचार झाला पाहिजे तरच संघटन मजबूत राहते, असे मार्गदर्शन केले.

या अभ्यासवर्गाचे उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्मय पंड्या यांच्या हस्ते झाले. या अभ्यास वर्गात भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाच्या वतीने प्रभारी चंद्रकांत धुमाळ व महामंत्री सुरेश पाटील उपस्थित आहेत. या पाच दिवशीय अभ्यासवर्ग शिबिरात भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय नेते मार्गदर्शन करणार आहेत. 23 सत्रांमध्ये भारतीय मजदूर संघाची संघटना संस्कृती, मौलिक सिद्धांत, नवीन लेबर कोड, वर्तमान आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक मूल्ये आणि कुटुंब व्यवस्था, व्यवस्था परिवर्तन व कामगार संबंधित अन्य विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply