Breaking News

गणेशोत्सवासाठी रायगड होतोय सज्ज; एक लाख 526 गणेशमूर्तींची यंदा प्रतिष्ठापना

अलिबाग : प्रतिनिधी

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी घरोघरी सुरू झाली आहे. सर्व अटी-नियमांचे पालन करून बाप्पाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज

होत आहेत.गणेशोत्सवाला येत्या शनिवार (दि. 22)पासून सुरुवात होत आहे. रायगड पोलिसांच्या कार्यक्षेत्रात यंदा 287 सार्वजनिक, तर एक लाख 239 घरगुती अशा एकूण एक लाख 526 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.गणपतीच्या आगमनासाठी चार दिवस शिल्लक असल्याने घरोघरी गणेशभक्तांची लगबग पहायला मिळत आहे. रंगरंगोटी, आरास करण्याचे काम जोरात सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा बाजारपेठेत खरेदीची झुंबड नसली, तरी लोक सावधपणे आणि सवड मिळेल त्या प्रमाणे खरेदी करीत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. जिल्हाधिकार्‍यांनीही गणेशोत्सव कसा साजरा करायचा याबाबतचे आदेश जारी केले आहेत. रसायनी : गणरायाच्या आगमनाला अवघे चार दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीचे अंतिम टप्प्यातील काम करताना गुळसुंदे येथील कारागीर रूपेश रसाळ.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply