Breaking News

सीकेटी कॉलेजमध्ये रोजगाराभिमुख नव्या अभ्यासक्रमांना सुरुवात

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात (स्वायत्त) शैक्षणिक वर्ष 2022-2023पासून एमएससी इन डेटा अ‍ॅनॅलिटिक्स, एमकॉम इन बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्स आणि पीजी डिप्लोमा इन अ‍ॅनॅलिटिकल इन्स्ट्रूमेंटेशन या नवीन अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मुळे समग्र शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल येऊ घातले आहेत. ज्यामध्ये पारंपरिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. या सर्व घटकांचे विश्लेषण करून पनवेल व सभोवतालच्या क्षेत्रातील युवकांना दर्जेदार, उद्यमशील व उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन त्याची यथोचित पूर्तता करण्याच्या हेतूने सीकेटी महाविद्यालयात नव्या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांच्या पूर्ततेनंतर उमेदवारांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रात अनेक नामी संधी उपलब्ध होणार आहेत. प्रस्तुत अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येत प्रवेश घेऊन त्याचा लाभ करवून घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी केले आहे. नवीन अभ्यासक्रमांच्या यशस्वी रचनेसाठी महाविद्यालयाच्या संगणकीय विज्ञान विभागच्या प्रमुख प्रा. प्रतिभा जाधव, लेखा व वित्त विभागाचे प्रमुख डॉ. निलेश कोळी आणि रसायनशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. ज्योत्सना ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. उद्योग क्षेत्राची गरज लक्षात घेऊन तथा शिक्षण क्षेत्रात आगामी काळातील येऊ घातलेल्या बदलांचा विचार करून नाविन्यपूर्ण पद्धतीने नवीन अभ्यासक्रमांची मुहूर्तमेढ रोवल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी कौतुक केले.

अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी किमान पात्रता पुढीलप्रमाणे

* एमएससी इन डेटा अ‍ॅनॅलिटिक्स, एमकॉम इन बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्ससाठी उमेदवार मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाच्या विज्ञान, वाणिज्य तथा अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर असावा.

* पीजी डिप्लोमा इन अ‍ॅनॅलिटिकल इन्स्ट्रूमेंटेशनसाठी उमेदवार मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाच्या विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयातील पदवीधर असावा.

(याव्यतिरिक्त प्रस्तुत अभ्यासक्रमांविषयी अधिक माहिती तथा प्रवेश प्रक्रियेसाठी सीकेटी महाविद्यालय, खांदा कॉलनी येथील प्रशासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा)

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply