Breaking News

पनवेलमध्ये भजनी भक्तिरंग कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघात गुरूपौर्णिमेनिमित्त भक्तिरंग कार्यक्रमाचे बुधवारी (दि.13) आयोजन केले होते. दत्ता ढोले यांनी सादर केलेल्या श्री दत्तगुरू स्तवन स्तोत्राने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

प्रथेप्रमाणे आठवड्यांतील सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. उपाध्यक्षा माधुरी गोसावी यांनी पर्जन्य सहलीबाबत माहिती दिली. त्यानंतर संघाच्या भजनी महिला मंडळाचे गुरू (प्रशिक्षक) बुवा विकास कडू यांचा संघातर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यांत आला.

याच कार्यक्रमात संघाचे सभासद प्रमोद वनगे यांनी देणगी दाखल आणलेली साऊंड सिस्टीम संघाचे अध्यक्ष जयंत गुर्जर यांना सुपुर्द केली. या साऊंड सिस्टीमवर दत्ता ढोले यांनी दोन गीते सादर करून सिस्टीमची सुरूवात केली. त्यानंतर भजनीबुवा विकास कडू यांनी सुश्राव्य व कर्णमधुर अशी भजने सादर करून सभासदांना भक्तीरंगात गुंतवून ठेवले. संघाच्या भजनी महिलांनी त्यांना उत्तम साथ दिली. संवादिनीवर स्वतः बुवा होते. तबला साथ नंदू साठे, पखवाज साथ मोहन शिरोडकर यांनी केली तर तालवाद्यावर काळे यांनी साथ दिली.

भैरवीने भक्तिरंग कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिव सचीन खेडेकर यांनी प्रभावीपणे केले. पसायदान होऊन कार्यक्रम समाप्त झाला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply