अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे माजी कार्यवाह स्व. नथुराम पाटील यांच्या स्मरणार्थ 23 व 24 जुलै रोजी जिल्हा कॅरम अजिंक्यपद व निवड स्पर्धा कर्जत येथे आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे कर्जत दहिवली येथील भवनात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, वयस्कर पुरुष अशा तीन गटांत स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. महिला एकेरी व प्रौढ गट पुरुष स्पर्धा 24 जुलै रोजी खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेतून रायगडचे संघ निवडण्यात येणार आहेत. हे संघ पुढील महिन्यात होणार्या 56व्या सिनियर राज्य कॅरम स्पर्धेत सहभागी होतील. स्पर्धेकरिता रोख बक्षीसे व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेची प्रवेश फी खेळाडू नोंदणीसह 200 रुपये आहे. स्पर्धेत नाव नोंदविण्याची अंतिम तारीख 19 जुलै आहे. नाव नोंदविण्यासाठी दीपक साळवी-पोयनाड (7020602335), सचिन नाईक-पनवेल (9222171260), पांडुरंग पाटील-कर्जत (7517570805), मनीष जोशी-महाड (8830387669), अमित यादव-रसायनी (9822791520) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेकरिता रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे खेळाडूंना दोन्ही दिवस दुपारच्या भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्व. नथुराम पाटील पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त कॅरमपटूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे व कार्यवाह दीपक साळवी यांनी केले आहे.