Breaking News

कर्जतमध्ये श्रवणयंत्रांचे वाटप

भाजप नेते निल सोमय्यांची उपस्थिती

कर्जत : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष कर्जत विधानसभा मतदारसंघ, युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्जत येथे श्रवणयंत्र वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात 64 लोकांना श्रवणयंत्रे देण्यात आली. या शिबिराला मुंबईचे माजी नगरसेवक निल सोमय्यांनी भेट दिली. कर्जत शहरातील विठ्ठल नगरमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात श्रवणयंत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजप कोकण समन्वयक सुनील गोगटे यांनी प्रास्ताविकात शिबिराबद्दल माहिती दिली. मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक निल सोमय्या आवर्जून  उपस्थित राहिले होते.  त्यांनी ’ऐका  स्वाभिमानाने’ या मोहिमे अंतर्गत होणार्‍या या उपक्रमबाबत माहिती दिली.  कर्जतमध्ये विविध उपक्रम राबाविण्यासाठी मदत करू, असा शब्द त्यांनी दिला. या शिबिरात 64 लोकांना युवक प्रतिष्ठानने खास परदेशातून बनवून घेतलेली श्रवणयंत्रे अत्यल्प दरात देण्यात आली. श्रवणयंत्र मिळाल्याबाबत शिबिरार्थींनी समाधान व्यक्त केले. भाजपचे वसंत भोईर, दिनेश सोळंकी, बळवंत घुमरे, मिलिंद खंडागळे, समीर सोहोनी, मारुती जगताप, नितीन कंदळगावकर, सूर्यकांत गुप्ता, सर्वेश गोगटे, विजय कुलकर्णी, सार्थक घरलुटे, अभिनय खांगटे, दर्पण घारे, कल्पना दस्ताने, स्नेहा गोगटे, नम्रता कंदळगावकार आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply