Breaking News

शेकापने पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कर्जबाजारी केले

आमदार महेंद्र दळवी यांची टीका

पाली ः प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डबे घेऊन कामाला जावे इतके कर्जबाजारी केले असल्याची जळजळीत टीका शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी यांनी केली. ते सुधागड तालुक्यातील बेणसे येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
बेणसे ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना रविवारी (दि. 9) धनादेश व वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी बोलताना आमदार दळवी यांनी शेकापचे नेतृत्व व कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. त्याचवेळी जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा सल्लागार तथा जि. प. सदस्य किशोर जैन, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, माजी बांधकाम सभापती संजय जांभळे, पेण तालुकाप्रमुख तुषारजी मानकवळे, अलिबाग तालुकाप्रमुख राजा  केणी, कामगार नेते दीपक रनावडे, अरुण कुथे, उपविभागप्रमुख अशोक भोय, महिला संघटका दीपश्री पोटफोडे, कल्पना पाटील, सरपंच मधुकर पारधी आदी उपस्थित होते.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply