Breaking News

तळीयेचा बहादूर जवान भारतीय सैन्यात ठरला अव्वल

आई-वडिलांना खरी श्रद्धांजली असल्याची भावना केली व्यक्त

पाली : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये दुर्घटनेत आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या बहादूर जवान अमोल कोंडाळकर भारतीय सैन्यात  अव्वल ठरलाय. भारतीय सैन्यात 150 जणांच्या ग्रुपमध्ये कॉम्बॅट इंजिनिअरींग इन्स्ट्रक्टर या कोर्समध्ये प्रथम येत पदक पटकावले. आई-वडिलांना हीच खरी श्रद्धांजली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
अमोलने सैन्यात भरती व्हावे व भारतमातेची सेवा करावी ही त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. त्यानुसार अमोल पांडुरंग कोंडाळकर हा भारतीय सैन्यात 2012मध्ये भरती झाला होता. अमोलची आई उषा कोंडाळकर या राजिप शाळा तळीयेमध्ये आहारिका म्हणून नोकरी करीत होत्या, तर वडील पांडुरंग तात्या कोंडाळकर हे शेती करीत असत. बहीण काजल पांडुरंग कोंडाळकर व पत्नी अश्विनी अमोल कोंडाळकर असा सुखी परिवार होता. 22 जुलै 2021च्या दरड दुर्घटनेत अमोलने आपले सर्व कुटुंब गमावले. भारतीय सैन्यामध्ये कॉर्पस् ऑफ इंजिनिअर या पदावर तो नोकरी करतो.

मला माझ्या  गाव व कुटुंबाला माझ्याकडून काहीतरी आगळी वेगळी श्रद्धांजली द्यावी असे मी मनात ठाणले. त्यासाठी सर्व दुःख मनात दाबून पुन्हा कर्तव्यासाठी रुजू झालो. आणि एका कोर्स ला सुरवात केली. दिवसरात्र मेहनत करून मोठ्या जिद्दीने त्या कोर्स मध्ये वर्चस्व मिळवले. 150 जणांच्या ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक व पदक पटकावून माझा युनिट, गाव व कुटुंबाचे नाव पुन्हा उंचावर नेले यात मला आनंद आहे.
-अमोल कोंडाळकर, भारतीय जवान

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply