Breaking News

जेएनपीटीत दक्षता जनजागृती सप्ताह

उरण : वार्ताहर

जेएनपीटीमध्ये 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 दरम्यान दक्षता जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. या दक्षता जागरूकता सप्ताहादरम्यान जेएनपीटीमध्ये कर्मचार्‍यांसाठी निबंध लेखण, नारा लेखण आणि वक्तृत्व यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासोबत महिला कर्मचार्‍यांसाठी विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

जेएनपीटीमधील सर्व कर्मचार्‍यांनी 26 ऑक्टोबर रोजी सत्यनिष्ठतेची शपथ घेतली. ‘दक्षता जागरूकता सप्ताह’च्या पार्श्वभूमीवर 29 ऑक्टोबर 2021 रोजी बंदराच्या ग्राहकांससोबत एक संवादी बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वतंत्र भारत 75: सत्यनिष्ठतेसह आत्मनिर्भरता या विषयावर एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये मध्य रेल्वेचे उप. मुख्य दक्षता अधिकारी नरेंद्र पनवार, आयआरटीएस यांनी मार्गदर्शन केले. याव्यतिरिक्त जेएनपीटी टाऊनशिपमधील सेंट मेरी हायस्कूल आणि आर. के. फाउंडेशन, जेएनपीटी विद्यालयामध्ये नैतिक आचरणातून यश या विषयावर दोन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.

जेएनपीटीने 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी प्रमुख रेडिओ चॅनेलवर स्वतंत्र भारत 75: सत्यनिष्ठतेसह आत्मनिर्भरता या संकल्पनेवर एक जनजागृती मोहीम देखील आयोजित केली होती. शिवाय, 26 ऑक्टोबर रोजी जेएनपीटी कर्मचार्‍यांसाठी आणि 28 ऑक्टोबर रोजी नवीन शेवा गावातील नागरिकांसाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले होते.

1 नोव्हेंबर रोजी जेएनपीटी प्रशिक्षण केंद्रामध्ये बक्षीस वितरण समारोह झाला. ज्यामध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना परितोषके वितरित करण्यात करण्यात आली. बक्षीस वितरण समारोहाचे प्रमुख पाहुणे व जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी कार्यक्रमास संबोधित केले. आपल्या संबोधनात सेठी यांनी प्रत्येकाने आपल्या विचार प्रक्रियेत सत्यनिष्ठेस प्राधान्य द्यावे, असे सांगितले.

या वेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ व मुख्य दक्षता अधिकारी विद्याधर मालेगावकर, आयआरटीएस व जेएनपीटीच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या समारंभात कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply