नवीन करण्यासाठी मागणी करणार -नाईक
नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. ही बाब राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली असून नव्याने प्रभाग रचना निर्माण करण्याची मागणी केली असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी नेरूळ येथे बोलताना सांगितले. नवी मुंबईतील तीन नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना नवीन गवते कुटुंब शिवसेनेच्या शिंदे गटाचे नसून ते आमचेच होते, असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्ष नेरूळ-कुकशेत, प्रभाग क्र. 34च्या विद्यमाने सलग चार दिवस विविध सामाजिक उपक्रम माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या पुढाकाराने सुरू आहेत. नवी मुंबई स्तरीय पावसाळी क्रिकेट स्पर्धा, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, नेरूळ सेक्टर 8, कुकशेत आणि सारसोले येथील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप, ज्येष्ठांचा सत्कार आदी विधायक उपक्रम सुरू आहेत.
या वेळी मनपाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यम, सिबीएससी शाळा, ज्युनिअर कॉलेज, सुसज्ज व्यायामशाळा, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आदी विधायक उपक्रम सतत राबवत असणार्या माजी नगरसेवक सुरज पाटील आणि सुजाता पाटील दाम्पत्यास प्रोत्साहित करण्यासाठी माजी मंत्री गणेश नाईक नेरूळमधील झुलेलाल मंदिर हॉल मधील कार्यक्रमात आले असताना बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर माजी मंत्री गणेश नाईक, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, सुजाता पाटील, जयश्री ठाकूर, अॅड. निरंत पाटील, माजी सरपंच बाळाराम पाटील, अभियंता विरेंद्र लगाडे, बजरंग माने आदी उपस्थित होते.
आमदार गणेश नाईक पुढे म्हणाले की, नवी मुंबई मनपाची घरपट्टी आणि पाणीपट्टी आणखी 20वर्षे वाढू देणार नाही. 500 चौ. फूट ते 700 चौ. फूट घरांच्या मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय आगामी काळात घेण्यात येईल, तसेच व्यापार्यांची पावसाळी वेदर शेडची मागणी नगरविकास विभागाशी बोलून निकाली काढू असे नाईक यांनी बोलताना सांगितले. या वेळी उत्कृष्ट कलाविष्कार रेखाटणार्या मधुरा भोईर याचा विशेष सत्कार करण्यात आला.