पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 20) माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे फुलस्टॅक डेव्हल्पमेट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अॅनोटेशन इन्फोटेक एलएलपीचे हरीश तडका हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते, तसेच रश्मी बसानी आणि ऐश्वर्या माहिते यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेचे आयोजन माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. मिनल माडवे तसेच राजश्री व प्रेरणा सातव यांनी सहकार्य केले. कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग घेतला व माहिती तंत्रज्ञान विषयाबद्दल असणार्या शंकांचे निरसन करून घेतले़.
कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड तसेच संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्राध्यापकांचे कौतुक केले, तसेच कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.