मोहोपाडा ः प्रतिनिधी
कसळखंड येथील प्रगत शेतकरी कमळाकर धोंडू घरत यांचे शेतात चारसुत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे.अशोका सीड्स कंपनीचे दोन किलो भात बियाणे लागवड करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक टि. एन. दोलतोडे आणि कृषी सहाय्यक मनिषा वळसे स्वत: शेतात उतरून शेतकर्यांसोबत भात लागवड प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.
दरम्यान चारसुत्री भात लागवड केल्यास शेतात भात उत्पादन वाढणार असून अशा लागवडीमुळे दोन्ही रोपांतील अंतर समांतर राहील्याने हवा खेळती राहून सुर्य प्रकाश सगळ्या रोपांना मिळतो.त्यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते.रोपे दोन ते तीन काड्या लावल्याने त्यांना फुटवे चांगले जोरदारपणे फुटतात असे कमळाकर धोंडू घरत यांनी बोलताना सांगितले.