Breaking News

पनवेल तालुक्यात महायुतीचा वादळी प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा गुरुवारी

(दि. 10) सलग दुसर्‍या दिवशी झंझावात पाहावयास मिळाला. पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात काढण्यात आलेल्या या प्रचार दौर्‍यास ग्रामस्थ मतदारांचा उत्स्फूर्त

प्रतिसाद लाभला.

विशेष म्हणजे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आकुर्ली, चिंचवली, रिटघर, दुंदरे, दुंदरेपाडा, शिवणसई, गाढेश्वर, मालडुंगे, वाजे, वाजेपूर, चेरवली आणि वाड्यांवर जाऊन आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार केला. या प्रचार दौर्‍यात भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रल्हाद केणी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, संघटक रामदास पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, समिना साठी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, रेश्मा शेखर शेळके यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

-शेकापच्या नवनाथ खुटारकर यांचा प्रचार दौर्‍यात पक्षप्रवेश प्रचार दौर्‍यात वलप ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ महादू खुटारकर यांनी शेकापच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी वलपचे माजी उपसरपंच जे. के. पाटील, प्रभाकर पाटील, दत्तात्रय पाटील, संजोग पाटील, सम्राट पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply