उरण : वार्ताहर, बातमीदार, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील भेंडखळ येथे रासायनिक पाणी खाडीमध्ये सोडल्यामुळे मासळी मेलेली आढळून आली. यामुळे सर्व ग्रामस्थांमध्ये रोष पसरला आहे.
उरण तालुक्यातील भेंडखळ गावा नजदिक असलेल्या खाडीत रात्री अज्ञात व्यक्तीने रासायनिक पाणी टँकरद्वारे खाडीच्या पाणीत सोडले आहे. त्यामुळे सर्व मासे, जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे भेंडखळ ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक दिवसा पासून असे प्रकार सुरू आहेत. या अगोदर सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत अशा घटना वारंवार का घडतात ? मागील काही दिवसांपासून अशा घटना घडून सुध्दा सदर अज्ञात व्यक्तीवर का कारवाई होत नाही ? पोलीस प्रशासन अशा घटना का रोखू शकत नाही. असा सवाल भेंडखळ मधील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
बाहेरील वाहने अंधाराचा फायदा घेत अर्ध्या रात्री अशा केमिकल युक्त रसायनांचा साठा गुपचूपपणे खाडीमध्ये सोडतात अशाने पाण्यातील मासे, खेकडे, समुद्री साप, कासव आदी प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तर अनेक मासे प्राणी मृत्युमुखी पडतात. आणी हीच मासे स्थानिक नागरीकांनी खाल्ली तर त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.प्रशासनाने या गोष्टीची खोलवर दखल घ्यावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी; अनाथ अशा घटना होताना दिसल्यास ग्रामस्थ त्या चोरांना चांगलाच चोप देतील, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.