Breaking News

झोपडपट्टी भागात उच्चदाबाने पाणीपुरवठा होणार

नवी मुंबई : प्रतिनिधी

गावठाण लगत असलेल्या चाळी आणि झोपडपट्टी भागांत कमी दाबाने होत असलेला पाणी पुरवठा बाबत रिपब्लिकन सेना, नवी मुंबईच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनंतर, झोपडपट्टी भागात उच्चदाबाने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात नवी मुंबई पालिका प्रयत्नशील असल्याचे कार्यकारी अभियंता विजय राऊत यांनी रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाला सांगितले.

स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असतांना नवी मुंबईतील गावठाण लगत असलेल्या चाळी, झोपडपट्टी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याची काटकसर करावी लागते. याविरोधात रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई प्रमुख, खाजा मिय्या पटेल यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पत्रव्यवहार करून, उच्च दाबाने झोपडपट्टी विभागात पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती.

पालिकेच्या तुर्भे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय राऊत यांची रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी, गावठाण लगत असलेल्या चाळी व झोपडपट्टी भागात उच्च दाबाने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात पालिकेने प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply