अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी -कर्मचार्यांचीही तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीदेखील सोमवारी (दि. 13) स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्न करीत आहेत. आरोग्य यंत्रणेबरोबर जिल्हा आणि पोलीस प्रशासनही काम करीत आहेत. शासकीय कार्यालयात येणार्या अधिकारी आणि कर्मचारी यांचाही संपर्क एकमेकांशी येत असतो. ते लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, कोषागार कार्यालयातील कर्मचार्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर अधिकारी आणि कर्मचारी यांचे तापमान तपासून कोणता आजार आहे का याची तपासणी करीत आहेत. शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांची तपासणी केली जात असल्याने त्यांच्याही आरोग्याची काळजी जिल्हा प्रशासन घेत आहे.
पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचीदेखील तपासणी केली जाणार आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …