पनवेल ः रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर, घर जल या योजनेंतर्गत तालुक्यातील पळस्पे येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 12) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी आमदार महेश बालदी यांनी, मी पाठपुरावा केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचे काम इतर राजकीय मंडळी करत आहेत. आपण भारतीय जनता पक्ष म्हणून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर राहू आणि उरण मतदारसंघाचा चेहरा बदलण्याचे काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी, पळस्पे गावत नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत तब्बल एक कोटी 19 लाख 99 हजार रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांतून होत आहे, त्याचा आनंद आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना नक्कीच आहे, असे मत व्यक्त केले. या वेळी पळस्पे सरपंच चंद्रकांत भोईर, उपसरपंच सपना वारके, पळस्पे भाजप अध्यक्ष सुनील गवंडी, ग्रामपंचायत सदस्य विजय गवंडी, माजी सरपंच रघुनाथ गवंडी, दिनेश बेडेकर, अजय तेजे, प्रकाश चौधरी, विकास भगत, राकेश कांबळे, अरुणा भोईर, मंगेश वाकडीकर, राजेंद्र पाटील, अनेश ढवळे, दत्तात्रय हातमोडे, जमदाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ
उपस्थित होते.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …