Breaking News

नेरळ रेल्वेस्थानकात उद्वाहनची उभारणी

आता प्रतीक्षा उद्घाटनाची

कर्जत : बातमीदार

नेरळ या जंक्शन रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेकडून उद्वाहन यंत्रणा बसविण्यात आली आहे. आता हे उद्वाहन प्रवाशांच्या सेवेत कधी येणार, या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

नेरळ स्थानकातील पादचारी पूलला तब्बल 47 पायर्‍या आहेत. त्या चढताना विशेषत: ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी आणि विद्यार्थी यांची दमछाक व्हायची. त्यामुळे  रेल्वे प्रवासी संघटनेकडून नेरळ रेल्वेस्थानकात उद्वाहन आणि सरकता जिना बसविण्यात यावा,  अशी मागणी केली जात होती. त्याची दखल घेत नेरळ रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या मुंबई बाजूला उद्वाहन तर कर्जत दिशेला सरकता जिना बसविण्याचे मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार नेरळ रेल्वेस्थानकातील उद्वाहन यंत्रणा बसवून पूर्ण झाली आहे. आता या यंत्रणेची सुरुवात कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, नेरळ स्थानकात सरकता जिना बसविण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घ्यावे, अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर तसेच राजेश गायकवाड, मिलिंद विरले, आबा पवार या पदाधिकार्‍यांकडून केली जात आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply