नागोठणे ः प्रतिनिधी – स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 30) सायंकाळी नागोठणे शहरात वादळात नुकसान झालेल्या भागाला भेट दिली. या भेटीनंतर आ. पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन यासंदर्भात चर्चा केली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, रोहे तहसीलदार कविता जाधव, रोहे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, सरचिटणीस आनंद लाड, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, माजी सरपंच फरमानशेठ दफेदार, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, श्रेया कुंटे, सुरेश जैन, ज्ञानेश्वर साळुंके आदी उपस्थित होते. या वेळी आ. पाटील यांनी उपस्थित सरकारी अधिकार्यांना यासंदर्भात काही सूचना करून नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे सूचित केले. तहसीलदार कविता जाधव यांनी सकाळपासून येथे पंचनामे करण्यास प्रारंभ करण्यात आल्याचे सांगितले. शासनाच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त सहा हजार रुपये मिळू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …