आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील दुंदरे येथे साहिल महिला बचत गटाचे रास्त भाव धान्य दुकान सुरू झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 26) करण्यात आले. या वेळी त्यांनी महिलांपर्यंत विविध लाभदायक योजना पोहचवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. रास्त भाव दुकानाच्या उद्घाटनावेळी दुंदरे ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच निराबाई चौधरी, माजी सरपंच रमेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम चौधरी, माजी उपसरपंच दर्शना चौधरी, गुरूनाथ उसाटकर, दिलीप उलवेकर, डॉ. रोशन पाटील, महिला मंडळाच्या अध्यक्ष वैशाली पाटील, उपाध्यक्ष मनीषा भगत, खजिनदार ललिता चौधरी, रेश्मा चौधरी, पुष्पा पाटील, जयश्री सिनारे, कल्पना चौधरी, मंदा पाटील, बेबी शेलार, नर्मदा चौधरी, नाना पाटील, संतोष चौधरी, राजेश चौधरी, दिलीप पाटील, सत्यवान पाटील. महेंद्र सिनारे, कृष्णा सिनारे, किशोर पाटील, मच्छिंद्र पाटील, संजय शेलार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सर्वसामान्य कुटूंबातील महिला देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊ शकते हे आपण द्रौपदी मुर्मू यांच्यावरून पाहिले आहे. त्यामुळे महिलांनी जिद्दीने एखादी गोष्ट करण्याचे ठरवले तर त्या कोणत्याही क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतात. बचत गटांच्या माध्यमातून सर्व योजना महिलांपर्यंत पोहचवून त्यांचा लाभ मिळवून द्यावा तसेच रास्त भाव दुकानाच्या माध्यमातून महिलांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा.