Breaking News

आंबेत घाटात रिक्षा अपघात; तीन परदेशी तरुणी जखमी

माणगाव : प्रतिनिधी    

पर्यटनासाठी आलेल्या परदेशी तरुणींच्या रिक्षाला अपघात झाल्याने तीन तरुणी जखमी झाल्याची घटना आंबेत गावाजवळील घाटात बुधवारी (दि. 8) सकाळी घडली. ब्रोनिया लेवीस वय 28, क्लेअर किलर वय 28, इमा लमारी वय 25 सर्व रा.ऑस्ट्रेलीया, ह्या भारतात दि. 2 ते 15 जानेवारी दरम्यान फिरायला आल्या होत्या. बुधवारी आंबेत रस्त्यांनी दापोलीला जात असताना आंबेत घाटात पिंपळाचा माळ येथे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातात तीन महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी माणगाव उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच पोलीस हवालदार गणेश पवार, सारंगे, मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना सामाजिक कार्यकर्ते नावीद अंतुले, रहीम झटाम, बबलू सावंत, डॉ. स्वीटी, मुनीम मुकादम, यांच्या सहकार्याने रुग्नालयात दाखल केले. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply