Breaking News

नेरळ रेल्वेस्थानकातील उदवाहन यंत्रणा कार्यान्वित

कर्जत ः बातमीदार

मध्य रेल्वेच्या कर्जत एंडकडील नेरळ जंक्शन रेल्वेस्थानकातील प्रवाशांच्या सेवेत आली आहे. अनेक महिने रखडलेल्या नेरळ स्थानकातील उदवाहन बद्दल स्थानिक प्रवासी संघटना पाठपुरावा करीत होती.

मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पुलाला उदवाहन बसविले गेले आहे, मात्र स्टकचर तयार होऊन अनेक महिने लोटले तरी नेरळ स्थानकातील पादचारी पुलाला लागून बांधलेले उदवाहन प्रवासी वर्गाच्या सेवेत येत नव्हते.त्यामुळे स्थानकात उदवाहन व्हावे यासाठी प्रयत्न करणारे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी स्थानिक प्रशासनाला उदवाहन तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर 31 जुलैपासून नेरळ रेल्वे स्थानकातील उद वाहन कार्यान्वित झाली आहे. त्याबद्दल नेरळ प्रवासी संघटनेनं मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे आभार मानले आहे.

दुसरीकडे नेरळ स्थानकात फलाट दोन वर उदवाहन सुरू झाल्याने प्रवासी वर्गाने समाधान मानले आहेत. त्यानंतर आता नेरळ प्रवासी संघटनेने स्थानकातील कर्जत एंडकडे मंजूर असलेला सरकता जिना बसविण्याची मागणी अध्यक्ष संदीप म्हसकर तसेच राजेश गायकवाड, मिलिंद विरले, आबा पवार या पदाधिकारी यांनी केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply