Breaking News

पेणमध्ये इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे आयोजन

पेण ः रामप्रहर वृत्त

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मूर्तीकार समुदायासह जेएसडब्ल्यू ग्रुपने सहयोग केला आहे. रंग अभिमानाचा या संकल्पनेवर आधारित जेएसडब्ल्यू इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचे 5 ते 7 ऑगस्टदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तींना पर्यावरणस्नेही रंगांनी रंगविण्याबद्दल या मूर्तिकारांमध्ये जेएसडब्ल्यूचे जाणीवजागृती निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील बहुतेक भागात विकल्या जाणार्‍या गणेशमूर्ती रायगड जिल्ह्यात तयार होतात.

मूर्तिकार समुदायाने तयार केलेल्या गणेशमूर्ती महाराष्ट्र तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही लोकप्रिय आहेत. म्हणूनच मोठ्या संख्येने मूर्तिकार राहत असलेले पेण या गावाला गणेशमूर्तींचे निवासस्थान म्हणतात.

दरवर्षी अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रातील तलाव, नद्या आणि समुद्रात अशा लाखो गणेशमूर्तींचे विसर्जन होते. व्हीओसीचे प्रमाण कमी असलेले रंग वापरण्याबाबत सामाजिक जागृती निर्माण करण्याचे आणि समुद्रातील जीवांना असलेला धोका कमी करण्याचे जेएसडब्ल्यू पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे उद्दिष्ट आहे. आपल्या व्यावसायिक कामकाजामध्ये विविध शाश्वत कार्यपद्धतींच्या माध्यमातून जेएसडब्ल्यू ग्रुपचा भर पर्यावरणाच्या संरक्षणावर राहिलेला आहे.

पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाच्या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी या ग्रुपने पेण येतील मूर्तिकार समुदायाशी हातमिळवणी केली आहे. या मूर्तिकारांना जेएसडब्ल्यू पेंट्स वापरण्याची संधी देऊन हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply