Breaking News

भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाची उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अमर प्रभाकर ठाकूर, महेश जनार्दन पाटील, जगदिश विलास आगिवले, सरचिटणीसपदी दिनेश रवींद्र खानावकर, शेखर प्रकाश तांडेल, चिटणीसपदी दिनेश रसाळ, चिन्मय राजीव समेळ, खजिनदारपदी भूषण एकनाथ जळे, तर सदस्य म्हणून जमीर बशीर शेख, अक्षय रवींद्र राणे, अमित झावरे, विवेक होन, उदित कुमार नाईक, परेश बाबूराव पाटील, परेश हितेंद्र बोरसे, ऋचिता गुरुनाथ लोंढे, सुशांत संजय मोहिते आणि आशिष केसरीनाथ कडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्तदानाचे उपक्रम राबवून जिल्ह्यातून 1000पेक्षा अधिक रक्त पिशव्या संकलन, पीएम केअर्स फंडात मदत, आत्मनिर्भर युवा-आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत युवकांमध्ये मेड इन इंडिया वस्तूंचा वापर वाढावा यासाठी जागरूकता, ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, टास्क टू मेक द मास्क स्पर्धा असे अनेक उपक्रम आयोजित करण्याबरोबरच मोदी भोजन वाटप, अन्नधान्य वितरणात युवा मोर्चाने सहभाग घेऊन हे सर्व उपक्रम यशस्वी केले. आगामी काळातही युवा मोर्चाची टीम सदैव समाजोपयोगी उपक्रम राबवत राहील, अशी ग्वाही मयूरेश नेतकर यांनी कार्यकारिणी जाहीर करण्याच्या निमित्ताने दिली.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply