Breaking News

नगरसेविका संतोषी तुपे यांच्यातर्फे लसीकरण केंद्रावर बेंचेसची सुविधा

पनवेल : रामप्रहर वृत्त

कामोठे येथील पनवेल महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड लसीकरण होते. या वेळी येणार्‍या नागरिकांना जास्तवेळ रांगेत उभे राहू नये यासाठी भाजप नगरसेविका संतोषी तुपे यांनी त्यांच्या नगरसेवक निधीतून नागरिकांना बसण्यासाठी बेंच बसवून घेतले आहेत.

कामोठे सेक्टर 8 येथील पनवेल महानगर पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम चालु आहे. लसीकरण केंद्रावर येणार्‍या नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत असते. त्यामुळे त्यांना बसण्यासाठी बेंचेसची सुविधा देण्याचा निर्णय नगरसेविका संतोषी तुपे यांनी घेतला. त्यानुसार भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठेमधील प्रभाग 11 ‘अ’च्या नगरसेविका संतोषी संदीप तुपे यांनी त्यांच्या नगरसेवक निधीतून या लसीकरण केंद्रावर बेंचेस बसवून घेतले. त्याचप्रमाणे कामोठे प्रभाग 11 मधील विविध सोसायट्यांच्या आवारात व उद्याने येथे ही ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी बेंचेस बसवण्यात आले.

या वेळी कामोठे मंडळ प्रभाग 11चे अध्यक्ष रमेश गुलाब तुपे, नगरसेविका संतोषी तुपे, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी पद्मिनी मॅडम, डॉ. कीर्ती मुसळे, निरीक्षक डॉ. अमेय तसेच परिचारक, परिचारिका, त्याचप्रमाणे बुथ अध्यक्ष नारायण सोनवणे, कार्यकर्ते किरण उबाळे, योगेश अवघडे, संतोष नगमोडे, संदीप तुपे आदी उपस्थित होते.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply