दोन महिन्यात 161 जणांना मिळाली नवी दृष्टी
रोहा : प्रतिनिधी
रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 1) घेतलेल्या नेत्र तपासणी शिबिरात 182 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी मोतिबिंदू आढळलेल्या 45रुग्णांना नवीन पनवेलमधील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. मोतीबिंदू मुक्त रोहा अभियानाअंतर्गत गेल्या दोन महिन्यांत ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल 161रुग्णांंना नवी दृष्टी मिळाली आहे.
रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या शिबिरात आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचे मॅनेजर सचिन भुमकर, टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉ. निकिता म्हापूसकर, प्रिया अग्निहोत्री, नंदिनी देवधरकर, तान्या कटियार, नरेश आवलर, कल्पेश सावंत आदींनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. या शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. मोतीबिंदू आढळलेल्या 45रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
रोहा सिटिझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब, प्रदिप देशमुख, अहमदशेठ दर्जी, उस्मानभाई रोहेकर, मिलिंद अष्टीवकर, महेश सरदार, इल्यास डबीर, सचिन शेडगे, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, निलेश शिर्के, राजेश काफरे, शैलेश रावकर, दिनेश जाधव, दिनेश मोहिते, समिधा अष्टीवकर, भावेश अग्रवाल, शंतनू अष्टीवकर यांच्यासह ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.