Breaking News

विक्रांत पाटील यांनी गोविंद गार्डन सोसायटीसाठी बनविला काँक्रीट रॅम्प

पनवेल : वार्ताहर

प्रभाग 18 मधील स्वामी नित्यानंद मार्गाचे काँक्रीटीकरण होऊन बरीच वर्षे झाली आहेत, पण आद्यपही या मार्गावरील दुतर्फा स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे काम झालेले नाही. त्यामुळे स्वामी नित्यानंद मार्गालगतच्या सोसायट्यांना त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याची उंची वाढल्यामुळे सोसायट्यांमध्ये जाणार्‍या रस्त्याला उतार जास्त प्रमाणात होता. त्यामुळे दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांना रहदारीस त्रास होतो. या विषयाला अनुसरून गोविंद गार्डन सोसायटीच्या वतीने नगरसेवक विक्रांत पाटील यांना रॅम्प बनवून द्यायची विनंती करण्यात आली. सोसायटीच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत विक्रांत पाटील यांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगून मटेरियल मागवून काँक्रीट रॅम्प बनवून दिला. रॅम्प बनवून दिल्याबद्दल गोविंद गार्डन सोसायटीच्या लोकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांचे आभार मानले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply