Breaking News

सीकेटी विद्यालयात कराटे स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त

जपान कराटे सोतोकाई 24वी राज्यस्तरीय स्पर्धा रविवारी (दि. 22) नवीन पनवेल येथील सीकेटी हायस्कूलमध्ये झाली. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजप नेते एकनाथ भोपी, पांडुशेठ केणी, आत्माराम पाटील, कमळाकर केणी, सुरेश जाधव, रत्नकांत वंजारी, दत्ता शेलार, महेंद्र अरु, जिजू इब्राहिम आदी उपस्थित होते. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. राज्यभरातून 550 विद्यार्थी खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply