खारघर ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे बुधवारी (दि. 3) मशिन लर्निंग विथ पायथॉन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व समजवण्यासाठी व त्यांचा उपयोग करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. माधव मिश्रा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यशाळेचे आयोजन प्रा. मिनल मांडवे यांनी केले. प्रा. राजेश्री म्हात्रे, प्रा. महेश धायगुडे व प्रा. प्रेरणा सातव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक कार्यशाळेसाठी उपस्थित होते.
यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्षाच्या समन्वयक महेश्वरी झिरपे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आयोजकांचे कौतुक केले, तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.