कळंबोली ः प्रतिनिधी
केंद्र, राज्य, सरकारच्या महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना आहेत, त्या योजनाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पुढे या. या सर्व योजनांचे प्रशिक्षण आम्ही जागृती स्वयंरोजगार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून देणार आहे. त्यातून प्रशिक्षण घेणार्यांना मोफत साहित्याचे वाटप केले जाईल. तेव्हा महिलांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा ओबीसी सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर यांनी केले.
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमानगर, चिंध्रण येथे मोफत संगणक व शिलाई मशिन क्लासचे उद्घाटन एकनाथ देशेकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले महिला बचतगटासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यासाठी महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. आम्ही जागृती स्वयंरोजगार सेवा भावी संस्था, आरीन फाउंडेशनच्या व आध्याम सोशल फाउंडेशनच्या वतीने अनेक स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त चिंध्रण हनुमान नगर येथे सुरू करण्यात आले आहेत. या महिलांना कच्चा माल देण्यात येईल, त्यांनी तयार केलेला माल बाजारात विकण्याचे कामही या संस्थांकडून केले जाईल. माल तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आमच्याकडून दिले जाईल.
आरिन फाऊंडेशचे प्रकल्प अधिकारी किरण जाधव यांनी उपस्थित महिलांना योजनाचा माहिती दिली. महिलांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निरसन करण्यात आले. जागृती स्वयंरोजगार सेवा संस्था, आरीन फाउंडेशनच्या पदाधिकारी कायावती गोंधळी यांनी शासनाच्या सर्व योजनांची माहिती देऊन सहकार्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी महिला बचत गटाचे पदाधिकारी निता घरात, निलन बोंडे, अर्चना ठोंबरे, चंद्रभागा पाटील, मंदा देशेकर आदी गावातील महिला उपस्थित होत्या.