पनवेल ः रामप्रहर वृत्त
15 ऑगस्टला देशात 75वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त 15 जुलैपासून पुढील 75 दिवस कोविड लसीकरण अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार असून 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत कोविड लसीकरण अमृत महोत्सव आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तथास्तू हॉलमध्ये बूस्टर डोस शिबिर शुक्रवारी (दि. 3) आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या वेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता लोंढे, निता माळी, भाजप सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, अक्षया चितळे, अंजली इनामदार, सुहासिनी केकाणे, नंदा ओझेम संजय जैन, प्रविण मोहकर, अमित ओझे, गुरुबाथ लोंढे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.