Breaking News

हर घर तिंरगा अभियानासंदर्भात बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त

देशाचा 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरात राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत भाजप पनवेलच्या वतीने प्रभाग क्र. 14 ते 20मधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (दि. 4) पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत झाली.

हर घर तिंरगा अभियानासाठी देशभरात जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह, कृतज्ञतेची जाणिव वृध्दींगत व्हावी या उद्देशाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात हर घर तिरंगा अभियान उपक्रम राबवून घराघरात राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. या अभियानाच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने प्रभाग क्र. 14 ते 20मधील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली असून, या बैठकीत हर घर तिरंगा अभियानाबाबात जनजागृती करण्यासाठी सूचना देण्यात आल्या व सर्वानी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

या बैठकीला माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिल घरत, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply