Breaking News

पनवेलकरांची साथरोग तपासणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

प्रभाग क्र. 18 येथील वाल्मिकीनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर भाजप शहर सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पनवेल शहर सोशल मीडिया सेल, शहर संयोजक प्रसाद हनुमंते व उत्तर रायगड ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद म्हात्रे यांच्यातर्फे भरवण्यात आले. या वेळी कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सफाई कामगार संपूर्ण पनवेल नगराची साफसफाई करून रहिवाशांच्या तब्येतीची निगा राखण्याचे काम करीत असताना त्यांच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष होत असते. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिर भरविण्यात आले असल्याचे माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, श्वेता खैरे, मंजुळे, उत्तर रायगड ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश गायकर, युवा नेते दशरथ म्हात्रे, प्रीतम धनाजी म्हात्रे, गौरव कंडपीळे, उमेश इनामदार, महेश सरदेसाई, प्रसाद कंधारे आदी उपस्थित होते. पनवेल महापालिका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. अमेय राठोड, डॉ. अनमोल ठाकूर, डॉ. कांचन तांदळे तसेच तेरणा हॉस्पिटलचे डॉ. अजित निळे यांचे व त्यांच्या संपूर्ण टीम विशेष सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी होण्यासाठी येथील कार्यकर्ते सागर मंगवाणी, सनी बेद, पंडित, यतीन रावल आणि कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply