नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन यांच्या 90व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, वर्षाच्या सुरुवातीस काही लोकांचा असा अंदाज होता की, भारतात कोरोना विषाणूचा परिणाम खूप तीव्र स्वरूपाचा असेल. लॉकडाऊन, सरकारने घेतलेले पुढाकार आणि जनतेनेचा लढा या कारणास्तव भारत इतर देशांच्या तुलनेत चांगली स्थिती आहे. तसेच भारतातील रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे. कोणाचीही मृत्यू होणे ही
दुर्देवी बाब आहे. देशात एक दशलक्ष लोकसंख्येमागे 12 मृत्यूंची नोंद आहे, तर इटलीमध्ये हाच दर 500 इतका आहे, पण आता आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे काळाची गरज आहे.
आठ कोटींहून अधिक कुटुंबांना गॅस जोडण्या देऊन स्वयंपाकघरातील धुरापासून मुक्त करण्यात आले आहे. बेघरांना आश्रय देण्यासाठी दीड कोटीहून अधिक घरे उभारण्यात आली आहेत तसेच आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना असल्याचेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …