Breaking News

नागोठण्यात धर्म फेरी; शेकडो तरुण-तरुणी सहभागी

नागोठणे : प्रतिनिधी

नागोठणे नगरीत हिंदू जनजागृती मंचच्या वतीने रविवारी (दि. 7)  नागोठणे शहरात धर्म फेरी काढण्यात आली होती. या धर्म फेरीत शेकडो तरुण-तरुणी सहभागी झाले होते.  नागोठणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामदैवत जोगेश्वरी मातेचे पूजन करून प्रेरणा मंत्राने रविवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास धर्म फेरीची सुरुवात करण्यात आली. हिंदू जनजागृती मंचाचे अध्यक्ष योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आलेल्या या  धर्म फेरीत हर हर महादेव, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, वंदे मातरम, हिंदू राष्ट्र की जय, हिंदू धर्म की जय, गर्व से कहो हम हिंदू है, अशा घोषणा देण्यात आल्या. बाजार पेठ, खुमाचा नाका, केएमजी प्रवेशद्वार, म. गांधी चौक, जोगेश्वरी माता मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय मार्गे धर्म फेरी पोलीस ठाण्यात आल्यानंतर सर्व हिंदूंच्या वतीने पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, हिंदू जन जागृती समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर, मोहन पार्टे व गोवर्धन पोलसानी यांनी हिंदू धर्मावर होणारे अत्याचार,जबरदस्तीने होणारे धर्मांतर, लव जिहाद तसेच धर्माबाबत माहिती दिली. देशासाठी वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर ध्येय्य मंत्राने या धर्म फेरीची सांगता करण्यात आली.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply