Breaking News

घरोघरी तिरंगा अभियानाची जनजागृती

पनवेल महापालिकेतर्फे मार्गदर्शनपर बैठक

पनवेल : वार्ताहर

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा फडकविण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी घरोघरी तिरंगा अभियानाची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी पत्रकारांना दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची माहिती देण्याचे कार्यक्रम विविध प्रभागामध्ये होत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनतागृतीसाठी कामोठे येथे ठरवानी को. ऑप हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्ष, सचिव व सक्रिय सभासद यांची बैठक घेण्यात आली. या बैठकित उपायुक्त विठ्ठल डाके यांनी झेंडा फडकविण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. या वेळी प्रभाग अधिकारी अरविंद पाटील, ठरवानी को. हौ. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सखाराम गारले उपस्थित होते. या बैठकीत 80 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला व घरोघरी तिरंगा मोहिमेबद्दल माहिती जाणून घेतली. अनेक नागरिकांनी भारतीय ध्वज विकत घेऊन सहकार्य केले. कामोठे येथील सेक्टर 34 मधील वृंदावन पार्क आणि सेक्टर 9 येथील साई रेसिडेन्सी को ऑफ हाउसिंग सोसायटी लि. ठिकाणी ‘घरोघरी तिरंगा’ अभियानबद्दल सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे माहिती  दिली. नागरिकांना या अभियानात सामील होण्याचे आवाहन केले. प्रभाग समिती ब कळंबोलीच्या वतीने ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सुधागड एज्युकेशन सोसायटी शाळेमध्ये राष्ट्रीय तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले, तसेच कळंबोलीच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांना ‘घरोघरी तिरंगा’अभियानाची माहिती दिली व या अभियानात सामील होण्याचे आवाहन केले. प्रभाग समिती ड च्यावतीने सोमवारी व्ही. के. हायस्कूल पनवेल आणि ब्रांझ हायस्कूल सोसायटी मिडल क्लास को-ऑपरेटिव्ह सोसायटी पनवेल यांच्या सहकार्याने घरोघरी तिरंगा मोहीमेच्या जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभातफेरी उपायुक्त विठ्ठल डाके, प्रभाग समिती ड प्रभाग अधिकारी अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply