Breaking News

आयआयटीएमएस प्रणाली होणार अद्ययावत

एनएमएमटीच्या प्रवाशांना मिळणार सुविधा

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या दैनंदिन परिचलनामध्ये अत्याधुनिक आयआयटीएमएस  प्रणालीचा वापर करण्यात येत असून या अत्याधुनिक प्रणालीच्या प्रभावी वापराबद्दल नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.

या प्रणालीद्वारे सुरू असलेल्या कार्यवाहीचा प्रत्यक्ष आढावा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी एनएमएमटी मुख्यालयाच्या कंट्रोल रुममध्ये घेताना संपूर्ण प्रणालीची बारकाईने पाहणी केली, तसेच त्यामधील प्रवाशांना सोयीचे होईल आणि परिवहन उपक्रमालाही दैनंदिन परिचलनाचा आढावा घेताना सोयीचे होईल अशा प्रकारच्या सुधारणा सूचविल्या.

सन 2017 पासून अत्याधुनिक आयआयटीएमएस प्रणाली एनएमएमटी मध्ये राबविण्यात येत असून काळानुरूप ही प्रणाली अद्ययावत करण्याची गरज असल्याने त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर यांना दिले. एनएमएमटीचे प्रवासी वापरात असलेले प्लिकेशन वापरण्यास अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने आवश्यक बदल करावेत तसेच त्याची मांडणी आकर्षक असावी असेही आयुक्तांनी सूचित केले. या वेळी आयुक्तांनी परिवहन उपक्रमाच्या दैनंदिन डेपोनिहाय अहवालाची बारकाईने पाहणी केली. यामध्ये वाहनाची धाव व उत्पन्नाचा तपशील याची तुलनात्मक तपासणी करण्यात आली. आपली प्रवासी सेवा प्रमाण मानकाच्या मर्यादेत असण्याबाबत खात्री करण्यासाठी या अहवालांचा उपयोग व्हावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

सद्यस्थितीत परिवहन उपक्रमाकडे नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड वापरासाठी 250 मशीन असून त्याचा परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील 25 टक्के गाड्यांवर वापर होत आहे. 100 टक्के गाड्यांमध्ये त्याचा वापर होण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. त्याचप्रमाणे प्राधान्याने प्रवाशांची सोय हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून प्रवाशाकडे कोणत्याही बँकेचे डेबिट अथवा क्रेडीट कार्ड असेल तरी त्याला त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या कार्डने एनएमएमटी प्रवासाचे टिकीट काढता यावे, अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply