Breaking News

भाजप खारघर कार्यालयात क्रांती दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त

आजादीच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 9 ऑगस्ट 2022 रोजी सेक्टर 13 भाजप कार्यालय येथे खारघर तळोजा महिला मोर्चाच्या माध्यमातून क्रांती दिन साजरा करण्यात आला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवर तटस्थ उभे राहून देशाचे संरक्षण करणारे आर्मीचे ऑफिसर्स यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास आर्मीचे माजी ऑफिसर गजे सिंग, शिवप्रसाद थपलीयाल, खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, विपुल चौटलिया, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, रायगड जिल्हा उपाध्यक्ष संध्या शारबिंद्रे, सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम, सेक्टर 11 अध्यक्ष अश्विनी भुवड, ओबीसी जाती मोर्चा सहसंयोजिका वैशाली प्रजापती, अनुसूचित जाती मोर्चा सदस्य सीमा खडसे, विजय लक्ष्मी सरकार, जयश्री गवळी मीनाक्षी आ अंथवाल यांनी उपस्थित राहून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमात ब्रिजेश पटेल व शिवप्रसादजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर सरचिटणीस साधना पवार यांनी प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे आयोजन भाजप महिला मोर्चा खारघर अध्यक्ष वनिता पाटील व सरचिटणीस साधना पवार यांनी केले होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply