Breaking News

स्थायी समितीच्या सभेत अध्यक्षांनी मानले सर्वांचे आभार

पनवेल ः प्रतिनिधी

माझ्या कारकिर्दीत महापालिका मुख्यालय, क्रिकेट केडमी, पायाभूत सोयीसुविधांची कामे, समाजमंदिरे अशी कामे होऊ शकली. त्याबद्दल सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो असे स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष नरेश ठाकूर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात प्रतिपादन केले-महापालिकेची स्थायी समितीची पहिल्या पंचवार्षिक मधली शेवटची सभा शुक्रवारी (दि. 8) महापालिका मुख्यालयात अध्यक्ष नरेश ठाकूर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी स्थायी समितीचे स्थायी समिती सदस्य या सभेला सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, जगदिश गायकवाड, संतोष शेट्टी, नीलेश बावीस्कर, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, संतोष भोईर, उपायुक्त सचिन पवार, कैलास गावडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त वैभव विधाते, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, सचिव तिलकराज खापर्डे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेतर्गंत मे. व्ही. आर. पी. असोसिएशन यांच्या राजीव गांधी आवास योजनेंतर्गत दिलेल्या सर्वेक्षणाच्या व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालांसाठी देय असलेल्या फी ला स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यानंतर अध्यक्षांनी आपल्या निरोपाच्या भाषणात समितीचे सदस्य, अधिकारी व कर्मचार्‍यांचे आभार मानले.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply