Breaking News

‘बाळासाहेबांनी विमानतळाला स्वत:चे नाव नाकारले असते’

नाशिक : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याचे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे, मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चे नाव देणे नाकारले असते, असे म्हटले आहे. ते टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. नामकरणाचा वाद एकत्र बसून सोडवावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. याद्वारे विमानतळ नामकरणाच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी शिवसेनेला सुनावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply