Breaking News

भाजपतर्फे माजी सैनिकांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका आणि शहर महिला कमिटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने आपल्या भागातील थोर व्यक्ती की, ज्यांनी देशसेवा केली आहे अशा व्यक्तींचा त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करावा, असा आमदार प्रशांत ठाकूर यांचा मानस असून त्याप्रमाणे पनवेल शहर आणि तालुका महिला मोर्चातर्फे शहरातील अनेक माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये प्रामुख्याने सरोजिनी सदाशिव ठाकूर, श्याम वालावलकर, सुरेंद्र गोडबोले, बबनराव जगनाडे आणि माजी भारतीय वायु सेना अधिकारी मिलिंदजी नरसे यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ, आणि एक पुस्तक देऊन त्यांनी केलेली देश सेवेबद्दल त्यांचे कौतुक आणि आभार मानण्यात आले.

या वेळी भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी, सुहासिनी केकाणे, सपना पाटील, अंजली इनामदार, नीता मंजुळे आदी महिला उपस्थित होत्या.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply