Breaking News

खरी शिवसेना आमच्यासोबतच!

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता, पण आता परिस्थिती बदलल्याने खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला तसेच भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (दि. 10) ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. बिहारमधील राजकीय घडामोडींवर भाजपचे सुशील मोदी यांनी भाष्य केले आहे. भाजप मित्र पक्षांना धोका देत नाही, पण जे भाजपला धोका देतात त्यांचे काय होते हे महारष्ट्रात पहिले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. बिहारमध्ये आमच्या पक्षाचे 75 जण, तर जेडीयुचे 42 जण निवडून आले होते. तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही. तिथे आज सरकार गेले आहे, पण तिथे आमचे सरकार पुन्हा येईल, असे ते म्हणाले.
आमचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे 50 आमदार आहेत आणि आमच्या पक्षाचे 115 आमदार आहेत. तरीही आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिले आहे. त्यांचे नऊ आणि आमचे नऊ असा 18 जणांचा शपथविधी झाला आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply