Breaking News

वाईनमध्ये गुंगीचे औषध मिसळून बलात्कार

वसई ः प्रतिनिधी

वाढदिवसानिमित्त 27 वर्षीय तरुणी बोरिवलीहून नायगाव येथे एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये मैत्रिणीसह तिच्या प्रियकरासोबत गेली होती. दरम्यान, तरुणीच्या वाईनमध्ये गुंगीचे औषध मिसळून मैत्रिणीच्या प्रियकराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सरला काळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 13 फेब्रुवारीच्या म्हणजेच व्हेलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला 27 वर्षीय तरुणी तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बोरिवलीहून नायगाव येथे एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तेथे मैत्रीण आणि तिचा प्रियकर अगोदरपासूनच उपस्थित होते. मैत्रिणीच्या प्रियकराने वाईनमध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. बारमध्ये मैत्रिणीसह पीडित तरुणी वाईन प्यायली होती. वाढदिवस असलेल्या तरुणीच्या वाईनमध्ये ती येण्याआधीच प्रियकराने गुंगीचे औषध मिसळले होते. त्यानंतर दोघी जणीदेखील नशेत असल्यामुळे पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने आपल्या घरी राहण्याचा सल्ला दिला आणि ती घरी घेऊन गेली. 13 फेब्रुवारीच्या रात्री नायगाव येथे मैत्रिणीच्या घरी मैत्रिणीच्या प्रियकराने तरुणीवर बलात्कार केला. याबाबत पीडित तरुणीने वालीव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply