Breaking News

द्रुतगतीवर ऊर्से येथे सूचना फलक गर्डर

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा हद्दीतील ऊर्से गावाजवळ महाकाय गर्डर बसविण्यात आले आहे. या गर्डरवर महामार्गावर कुठे वाहतूक ठप्प आहे, कुठे अघटित घटना घडली आहे, सध्याची स्थिती व अंतर अशा सूचना वाहनचालक व प्रवाशांना मिळणार आहेत. हे गर्डर बसविण्याचे काम यशस्वी झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाच्या अभियंता नम्रता रेड्डी यांनी दिली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (दि. 9) दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येऊन या वेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात आली होती. ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याच्या कामकाजासाठी हा ब्लॉक घेण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेडतर्फे हे काम करण्यात आले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply